सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (08:48 IST)

Home remedies for cold and cough सर्दी- पडसं, आणि फ्लू पासून आराम देणारा ओव्याचा काढा

kadha
निरोगी आहार, व्यायाम आणि वेळेवर झोपणं या अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट बनविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. 
 
नित्यकर्माच्या व्यतिरिक्त काही अश्या गोष्टी आहे, ज्या आपल्या रोग प्रतिकारक क्षमतेला बळकट बनवून आपल्याला आजारापासून वाचवतं. आज आम्ही आपल्याला असे एक प्रभावी उपाय सांगत आहोत, ज्यामुळे आपण आपले फ्लू 4 ते 5 दिवसात सहजच बरे करू शकता, तर यामुळे आपली प्रतिकारक शक्ती देखील बळकट होणार.
 
ओव्याचे गुणधर्म - 
ओव्यामध्ये पोषक घटक भरपूर असतात. जे शरीरास निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतं. ओव्यांमध्ये अँटी-इंफ्लेमेट्री, अँटी-बैक्टीरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. 
 
साहित्य 
1 /2 चमचा ओवा, 
5 तुळशीची पानं, 
1 /2 चमचा काळी मिरपूड, 
1 मोठा चमचा मध.
 
कृती - 
एका भांड्यात 1 ग्लास पाणी, ओवा, काळीमिरी आणि तुळशीचे पानं घाला. पाण्याला 5 मिनिटे चांगली उकळी येऊ द्या. गॅस बंद करा. यामध्ये मध टाकण्यापूर्वी या मिश्रणाला थंड होऊ द्या. काढ्याला चांगल्या प्रमाणे ढवळा आणि पिऊन घ्या.
 
या काढ्याचे फायदे -
ओवा गुणधर्माने समृद्ध आहे. जेव्हा काळीमिरी, तुळस, मध घालून हा काढा तयार केला जातो तर या मधील गुणधर्म वाढतात. फ्लू पासून सुटका मिळविण्यापासून तर ओव्याचा काढा इतर त्रासापासून देखील सुटका देतो.
 
पोटाच्या आजारापासून सुटका
सर्दी पडसं आणि खोकल्यापासून सुटका
हिरड्यांच्या सुजे पासून सुटका
पाळीच्या वेदनेपासून सुटका
मुरुमांपासून सुटका
 
या गोष्टी लक्षात असू द्या -
एका दिवसात जास्त प्रमाणात ओव्याचे सेवन करणं त्रासदायक होऊ शकतं, म्हणून या काढ्याला दिवसातून एकदाच प्यावं. तर बाळाला दूध पाजणाऱ्या आईने आणि गरोदर बाईने याचे सेवन करू नये.