रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (22:25 IST)

Home Remedies घरातील डास दूर करण्यासाठी Refill Bottle याने भरा

mosquitoes
कोणत्याही आजारापासून बचाव करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे घरात डास येऊ न देणे. पण ते कसे शक्य आहे कारण हल्ली अनेक केमिकल्स वापरून देखील या त्रासापासून सुटका मिळत नाही. रात्री मच्छरदाणी लावून झोपता येते परंतू दिवसभर आणि विशेष म्हणजे संध्याकाळी डासांचा त्रास अधिक जाणवतो. अशात घरगुती उपायाने डास दूर करता येतील. यासाठी आपल्याला केवळ दोन वस्तू लागतील. तर बघू कशा प्रकारे या त्रासापासून दूर होते येईल.
 
साहित्य 
कडुलिंबाची पाने, कापराची भुकटी 
 
कृती
सर्वप्रथम कडुलिंबाची पाने स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये वाटून घ्या. याची थोडी पातळ पेस्ट करा. मिश्रण गाळून त्या पाण्यात कापराची भुकटी घाला आणि मंद आचेवर गरम करा. गार झाल्यावर डास दूर करण्यासाठी येणार्‍या लिक्विड रिफिल मशीनच्या बाटलीत भरून घ्या. रात्री सर्व दारे बंद करून ठेवा डास पळून जातील. हे पूर्णपणे नैसर्गिक असून आरोग्यासाठी सुरक्षित आहे.