1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2023 (17:33 IST)

Ghee With Warm Water रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे अनेक फायदे

Ghee With Warm Water तूप सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. गरम-गरम वरणा भातावर साजुक तूप, पोळीला तूप लावून खाणे अगदी सामान्य आहे. तूप हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, असे घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तुपामध्ये असलेले ब्युटीरिक ऍसिड बद्धकोष्ठतेच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे आणि चयापचय वाढवते.
 
कोमट पाण्यात तूप घालून प्यायल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. असं असलं तरी, काही लोक सकाळी गरम किंवा कोमट पाणी पितात, पण जर तुम्ही त्यात तूप टाकून ते प्यायलं तर पचनक्रिया तर चांगली राहतेच पण इतरही अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन कसे आणि का करावे.
 
 
 
गरम पाण्यात तूप मिसळून सेवन केल्याने फायदा होतो
 
तूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण त्यात भरपूर पोषक असतात. कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि हृदयाच्या आरोग्यालाही फायदा होतो. तुपामध्ये असलेले फॅटी अॅसिड हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय तुपात कॅलरीज, हेल्दी फॅट, व्हिटॅमिन ए, ई इ.
 
कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे खूप फायदे आहेत-
पचन- तुपात अनेक पोषक घटक असतात ज्याने पचन क्रिया सुरळीत राहते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याने पचन योग्य राहतं. दररोज याचे सेवन केल्याने डायजेस्टिव्ह एंजाइम्स सीक्रिशन वाढतं.
 
लठ्ठपणा- वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 2 चमचे तूप कोमट पाण्यात टाकून पिण्याने फॅट्स बर्न होण्यात मदत होते.
 
हाडं मजबूत होतात- दररोज तुपाचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात.
 
इम्युनिटी- रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात 2 चमचे तूप टाकून सेवन करावे. याने अनेक संसर्गापासून मुक्ती मिळते.
 
सुंदर त्वचा- सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत तुपाचे सेवन केल्यास त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तूप गुणकारी आहे.
 
बॉडी डिटॉक्स करण्यात मदत होते- कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. तुपात डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात, जे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात.