बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (07:30 IST)

अनोश्यापोटी लसूण खाण्याचे फायदे

बद्धकोष्ठतेचा आणि गॅसच्या त्रासापसून मुक्ती मिळवण्यासाठी लसूण एक चमत्कारी औषध ठरेल. 
 
आयुर्वेदात लसूण हे चमत्कारिक गुणधर्म असलेले औषध म्हणून वर्णिले आहे, याचे बरेच फायदे आहे. हे फक्त जेवण्याची चवच वाढवत नाही तर शरीरास निरोगी ठेवण्यास देखील मदत करतं. याच कारणामुळे बऱ्याच घरगुती उपचारांमध्ये लसणाचा वापर केला जातो. 
 
वास्तविक, लसणामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटकांचा समावेश आहे. या मध्ये कॅल्शियम ते तांबा, पोटॅशियम, फॉस्फोरस, आयरन आणि व्हिटॅमिन B1 इत्यादींचा समावेश आहे. तसं तर लसणाचा वापर कोणत्याही प्रकारे करू शकता. ते फायदेशीर आहेच पण अनोश्यापोटी खाल्ल्याने हे खूप फायदेशीर आहे. चला अनोश्यापोटी याचा सेवनाचे फायदे जाणून घेऊ या.
 
* रोग प्रतिकारक शक्ती सुदृढ करतं - 
लसणाला प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी प्रभावी मानले आहे. अभ्यासात आढळून आले आहे की जे लोक दर रोज लसणाचे सेवन करतात, त्यांना इतर लोकांपेक्षा सर्दी पडसं कमी होत. सकाळी अनोश्यापोटी त्याचे सेवन करणं जास्त फायदेशीर आहे.
 
* उच्च रक्त दाब असल्यास फायदेशीर -
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी दर रोज अनोश्यापोटी लसणाचे सेवन करावे, कारण या मध्ये रक्तदाब नियंत्रित करण्याचे गुणधर्म आढळतात. आपण लसणाला चावून चावून खाऊ शकता. या मुळे आपल्याला उच्च रक्तदाबात आराम मिळणार.
 
* हृदयाचा धोका कमी होतो - 
लसूण हृदयरोगाच्या धोक्याला कमी करतं. जर आपणास हृदयाच्या रोगापासून वाचायचे असल्यास तर दर रोज सकाळी लसणाचे सेवन करावे. आपण मधासह देखील लसणाचा सेवन करू शकता. या मुळे रक्ताभिसरण योग्य राहतं.
 
* पोटाशी निगडित त्रासापासून सुटका -
 जर आपण दररोज अनोश्यापोटी लसणाचे सेवन केल्यास पोटाशी निगडित त्रास जसे की बद्धकोष्ठता आणि गॅस पासून आराम मिळू शकतो. या मुळे पाचक प्रणाली देखील चांगली राहील. जे लोक ऍसिडिटीच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत, त्यांना भाजके लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.