शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

Home Remedies 'तूप'चे वैशिष्‍ट्‍य जाणून घ्या!

जेवण कसलेही असो, पंगतीला तूप वाढले की मगच जेवायला सुरुवात करायची आपली परंपरा आहे. एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे.

जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.

घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.

तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.

तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.

तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.

डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्‍या कपाळावर हलकेच मालीश करावे.
शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.

तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.
रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो.

तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.

कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे. रोज आहारात वापरले जाणारे तूप औषधी आहे.

- डॉ. सुनील बी. पाटील