बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (16:06 IST)

Ginger रिकाम्या पोटी आले खाल्ले आहे का?

रिकाम्या पोटी आले खाण्याचे 5 फायदे आणि 3 तोटे
 
रिकाम्या पोटी आले खाण्याचे फायदे
पचन- दररोज सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा छोटा तुकडा चघळल्याने किंवा आल्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. बद्धकोष्ठता, गॅस सारखे आजार दूर होतात.
 
पीरियड्स- मासिक पाळीच्या वेळी रिकाम्या पोटी आल्याचा एक छोटा तुकडा चघळल्याने वेदना आणि क्रॅम्प्स बर्‍याच प्रमाणात कमी होतात.
 
मधुमेह- मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे सेवन केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
 
वजन- रिकाम्या पोटी आल्याचे सेवन केल्याने चयापचय गती वाढते, ज्यामुळे वजन कमी होते.
 
हृदय- रोज सकाळी रिकाम्या पोटी आले किंवा आल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.
 
आले रिकाम्या पोटी खाण्याचे नुकसान
गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात आल्याचे सेवन करू नये.
जे हृदय किंवा उच्च रक्तदाबाचे औषध घेतात, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आल्याचे सेवन करावे.
उन्हाळ्यात आल्याचे जास्त सेवन करू नये, कारण त्याचा प्रभाव उष्ण असतो.