शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जुलै 2020 (16:17 IST)

Benefit of Bottle guard : दुधीच्या सालीचे औषधीय गुणधर्म जाणून घेऊ या...

दुधी किंवा दुधी भोपळ्याची भाजी जरी आपल्याला आवडत नसेल, पण त्याचा सालींमध्ये आरोग्य आणि सौंदर्याच्या समस्येपासून आराम देणारे गुणधर्म असतात, हे जाणून घेतल्यावर आपण बाजारपेठेतून भाजी आणताना दुधी भोपळा नक्कीच आणाल. जाणून घेऊ या दुधी भोपळ्याचा सालींमध्ये कोणते असे 3 औषधीय गुणधर्म आहेत-
 
1. सनबर्न किंवा टॅनिंग : आपणास हे जाणून आश्चर्य होणार, पण दुधीच्या सालींचा वापर उन्हात भाजलेल्या आणि काळपटलेल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. या साठी आपल्याला याची पेस्ट बनवून त्वचेवर लावून ठेवायचे आणि नंतर धुऊन टाकायचे आहे.
 
2.उष्णता आणि जळजळ : जास्त उष्णतेमुळे त्वचा आणि तळपायात जळजळ होऊ लागते, या पासून सुटकारा मिळवण्यासाठी दुधीच्या सालींचा वापर करू शकतो. या सालींना त्वचेवर चोळल्याने आराम मिळतो.
 
3. मूळव्याध : मूळव्याध किंवा पाईल्सचा त्रास होत असल्यास देखील दुधीचे साल फायदेशीर आहेत या सालींना वाळवून त्याची भुकटी बनवावी आणि दर रोज थंड पाण्यासह दिवसातून दोन वेळा घ्यावं. लवकरच आराम मिळेल.