रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

हळदीने बरा होतो गर्भाशाच्या मुखाचा कर्करोग

बहुगुणी हळदीला प्राचीन काळापासून आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. अनेक रोगांवर उपाय म्हणून हळदीचा सर्रास वापर केला जातो. आता हळदीमुळे गर्भाशाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालता येतो हे संशोधनाअंती सिध्द झाले आहे.

कोलकात्याच्या चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट (सीएनसीआय) या सरकारी संस्थेत याविषीचे संशोधन करण्यात आले. ह्युमन पॅपिलोमा नावाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गर्भाशाच्या मुखाचा कर्करोग होतो. हळदीत सर्क्युमिन नावाचा घटक असून तो या विषाणूंवर प्रभावी उपाय असल्याचा दावा सीएनसीआयने केला आहे. सीएनसीआयने आपल्या पाच वर्षाच्या संशोधनानंतर हा दावा केला असून या संशोधनात 400 महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. यातील काही महिलांना गर्भाशाच्या मुखाचा कर्करोग झाला होता तर काही महिलांना एचपीएव्हीचा संसर्ग झाला होता.

हळदीतून मिळवलेल्या सर्क्युमिनचा वापर करून तयार केलेला मलम आणि कॅप्सुल यातील 280 महिलांना देण्यात आली. त्या महिलांची नियमित तपासणी करून त्यांचा अभ्यास करण्यात आला. ज्या महिलांना एचपीव्हीची लागण झाली होती त्यातून त्या पूर्णपणे बर्‍या झाल्या आणि संसर्गही पूर्णत: थांबल्याचे आढळून आले, अशी माहिती सीएनसीआयचे संचालक जयदीप बिश्वास यांनी दिली.

ज्या महिलांना सर्क्युमिन देण्यात आले नव्हते, त्यांचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले. आपण दररोज जेवणाद्वारे हळदीचे सेवन करत असतो. मात्र त्या सेवनातून सर्क्युमिन यकृत किंवा रक्त प्रवाहात मिसळत नाही, त्यामुळे त्याने एचपीव्हीचा संसर्ग बरा होत नाही. त्यासाठी सर्क्युमिन हे मलम आणि कॅप्सुलद्वारे घेणे गरजेचे आहे, असे इन्स्टिटय़ूटमधील संशोधक पार्था बसू यांनी सांगितले.