रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (10:36 IST)

Home Remedies For Acidity:अॅसिडिटीपासून झटपट आराम मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करा

acidity
Home Remedies For Acidity:पोटात अॅसिडिटीच्या समस्येची अनेक कारणे असू शकतात. पण अॅसिडिटीची सर्वात मोठी समस्या म्हणजे ह्याचा त्रास कुठेही आणि कधीही होऊ शकतो. येथे जाणून घ्या अॅसिडिटी टाळण्यासाठी घरगुती उपाय.
 
सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय
1 थंड दुधाचे सेवन -
अॅसिडिटी शमवण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे थंड दूध. तुम्ही एक ग्लास थंड आणि फिकट दूध प्या. म्हणजेच दुधात साखर मिसळून पिऊ नका. तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
 
2 थोडासा गूळ खा -
पोटात जळजळ होत असताना गूळ खा, गूळ खाल्ल्याबरोबर आराम वाटू लागेल. गूळ खाल्ल्यानंतर एक ग्लास ताजे पाणी प्या.
लक्षात ठेवा गूळ खाल्ल्यानंतर सामान्य ग्लासपेक्षा कमी पाणी प्यायल्यास खोकला होऊ शकतो. त्यामुळे गूळ खाल्ल्यानंतर एक ग्लास पाणी प्या. पोटाला झटपट थंडावा मिळेल आणि ऍसिडिटी दूर होईल.
 
3 जिरे आणि ओवा - 
ओव्याची प्रकृती गरम आहे. पण हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ झाल्यास जिरे आणि ओवा  प्रत्येकी एक चमचा घेऊन तव्यावर भाजून घ्या. दोन्ही थंड झाल्यावर निम्मे करून साखर घालून खावे.उरलेले अर्धे तयार मिश्रण पुढच्या जेवणानंतर घ्या. एकाच डोसमध्ये तुम्हाला अॅसिडिटीपासून आराम मिळेल.थंड करून साखरेसोबत खाऊन घ्या. 
 
4आवळा खा- 
जर घरात आवळा असेल तर काळे मीठ लावून आवळा खाऊ शकता. तुम्हाला त्वरित आराम मिळेल. आवळा नसेल आणि आवळा कँडी असेल तर तुम्ही त्याचे सेवनही करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला 2 ते 3 मिनिटांत आराम मिळेल.