छातीत जळजळ होत असेल तर हे सोपे घरगुती उपाय अवलंबवा

Acidity
Last Updated: शनिवार, 7 मे 2022 (14:05 IST)
अन्न खाल्ल्यानंतर अनेकदा छातीत जळजळ सुरू होते. ही एक सामान्य समस्या आहे जी बऱ्याच लोकांना त्रास देते. वास्तविक, अन्न पचनाच्या प्रक्रियेत, आपले पोट असे ऍसिड तयार करते जे अन्न पचण्यास मदत करते. पण कधी कधी हे अॅसिड जास्त प्रमाणात तयार होते त्यामुळे छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. यासाठी लोक सहसा औषधे घेतात. पण काही घरगुती उपायांनीही आपण छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करू शकता. अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ दूर करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत .चला तर मग जाणून घेऊ या.


1 आलं - पोटाच्या जळजळीत आल्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. जेवल्यानंतर
छातीत जळजळ होण्याची तक्रार असल्यास, जेवणानंतर आल्याचा छोटा तुकडा चघळा किंवा आल्याचा चहा बनवून प्या. यामुळे छातीत जळजळ होण्यापासून लवकर आराम मिळेल.

2 ओवा
- अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ झाल्यास आपण ओव्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. यासाठी एक चमचा ओवा एक कप पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यावर गॅसवरून काढून थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर त्यात काळे मीठ टाकून प्या. असे केल्याने अॅसिडिटीच्या समस्येपासून लवकरच सुटका होईल.

3 ऍपल सायडर व्हिनेगर - ऍपल सायडर व्हिनेगर हा देखील छातीत जळजळ दूर करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. याच्या सेवनाने पोटातील ऍसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. यासाठी एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळून प्या.

4 गूळ - जेवणानंतर गोड म्हणून गूळ दिला जातो . गूळ आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. हे पचन प्रक्रियेला गती देते आणि पोटात ऍसिड तयार होण्यास प्रतिबंध करते. जर आपण अॅसिडिटीच्या समस्येने हैराण असाल तर जेवणानंतर थोडा गूळ खाऊन एक ग्लास पाणी प्या.
5 कोरफड - कोरफड आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे माहिती असेलच. पोटाशी संबंधित समस्यांमध्ये कोरफडीच्या रसाचे सेवन फायदेशीर ठरते. छातीत जळजळ होत असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी एक चतुर्थांश कोरफडीचा रस प्या.

6 ज्येष्ठमध - आयुर्वेदात ज्येष्ठमध हे अत्यंत फायदेशीर औषध मानले जाते. छातीत जळजळ होण्याच्या समस्येवर ज्येष्ठमधचे सेवन केल्याने लगेच फायदा होतो. यात अनेक आयुर्वेदिक घटक असतात जे छातीत जळजळ दूर करण्यास मदत करतात. ज्येष्ठमध बारीक करून बारीक भुकटी बनवा आणि त्याचे नियमित सेवन करा. असे केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होईल.

7 तुळस - तुळशी नैसर्गिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तुळशीला अनेक रोगांवर रामबाण औषध मानले जाते. छातीत जळजळ होत असेल तर सकाळी उठून तुळशीची काही पाने चावा. यामुळे
पोट दिवसभर थंड राहते आणि गॅस किंवा जळजळ होण्याची कोणतीही तक्रार होणार नाही.

8 लिंबू - लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. छातीत जळजळ होत असल्यास लिंबू आणि काळे मीठ पाण्यात मिसळून प्या. यामुळे पित्ताचा रस तयार होतो, जो अन्न पचवण्याचे काम करतो. असे केल्याने छातीत जळजळ होणार नाही.

यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

राधाकृष्णाच्या प्रेमाच्या अनोख्या गोष्टी

राधाकृष्णाच्या प्रेमाच्या अनोख्या गोष्टी
भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे नाते सामान्यतः पती-पत्नी नव्हे तर प्रियकर-प्रेयसी म्हणून ...

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर ...

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर विभागात IB येथे 766 पदांसाठी भरती अर्ज करा
IB Recruitment 2022 Notification: इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर ...

Yoga after eating जेवल्यानंतर रोज पाच ते दहा मिनिटे हा एक ...

Yoga after eating जेवल्यानंतर रोज पाच ते दहा मिनिटे हा एक योग करा, अपचन-गॅसच्या समस्येपासून सुटका मिळेल
वज्रासन म्हणजे वज्र समान. हे आसन केवळ तुमची पचनशक्ती सुधारत नाही तर तुमचे शरीर मजबूत आणि ...

Gopal Kala जन्माष्टमी विशेष गोपाळकाला

Gopal Kala जन्माष्टमी विशेष गोपाळकाला
गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, ...

Krishna Janmashtami Essay जन्माष्टमी निबंध

Krishna Janmashtami Essay जन्माष्टमी निबंध
असे मानले जाते की नक्षत्रांच्या हालचालीमुळे ऋषी (शैव संप्रदाय) एका दिवशी ते पाळतात आणि ...