शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

'दुबळेपणा'वर करा मात...

लठ्ठ होण्यासाठी आपण अनेक प्रोटीन पावडर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टॉनिक घेत असतो. ज्या लोकांना भूक लागत नाही त्यांना ही समस्या होते. भूक कमी लागल्यामुळे जेवण ग्रहण करण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे शरीरातील धांतूचे पोषण होत नाही. अशा स्थितीमध्ये शरीर दुबळे होते. यासाठी काही आयुर्वेदिक घरगुती टिप्स आम्ही तुम्हांला सांगत आहोत त्या पुढीलप्रमाणे:
 
दुबळेपणाच्या रूग्णांनी डायझेशनकडे लक्ष देत दुध, दही, तूप, इ. पदार्थाचे आधिक प्रमाणात सेवन करावे. 
 
तसेच दुबळ्या व्यक्तीनी व्यायाम, सेक्स, तणाव पूर्णपणे बंद करावा. 
 
या व्यक्तीनी भरपूर झोप घ्यावी. गव्हाची पोळी, मुग, तुरीची डाळ, पालक, पपई, भोपळा ,मेथी, पडवळ , पत्ताकोबी, अशा पदार्थाचे जास्त सेवन करू नये. 
 
दररोज सफरचंद ,डाळिंब, मोंसबी इ. फळांचा रस घ्यावा. तसेच जास्तीत-जास्त सुकामेवा, अंजीर, बदाम, काजू, मनुका, यांचे सेवन भरपूर प्रमाणात करावे. 
 
झोपतांना एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा शुध्द तूप टाकून घ्यावे. तसेच यामध्ये एक चमचा अश्‍वगंधा चूर्ण टाकल्यास लवकर लाभ होईल.
 
तसेच आरोग्यवर्धिनी वटी, च्यवनप्राश, बादाम, पाक, शतावरी पाक, लोकनाथ रस इत्यादी आयुवेर्दिक औषधांचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता.