शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (21:50 IST)

काय सांगता,हळद आणि लिंबू ने नैराश्य दूर होते

आजकाल बहुतेक लोक नैराश्याने म्हणजेच औदासिन्याने ग्रस्त आहेत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक इतर व्यक्ती वेगवेगळ्या तणावांनी वेढलेला असतो. या सर्वांच्या दरम्यान मानवासाठी मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे कठीण होते. बरेच लोक नैराश्याच्या समस्येने वेढलेले असतात आणि संघर्ष करतात,त्यावर उपचार करणे  अत्यंत महत्वाचे आहे.
 
मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेणं आणि इतर औषधे घेण्याऐवजी प्रथम हे घरगुती उपचार करून पहा, जे सोपे आहे आणि नैराश्य सारख्या समस्या सोडविण्यात सक्षम आहेत. या पद्धतींमध्ये हळद आणि लिंबू हे मदतगार ठरतील.
एका संशोधनानुसार, हळद अल्झायमर, पर्किन्सन, कर्करोग आणि कोलेस्ट्रॉल प्रमाणेच नैराश्यावर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे अँटीऑक्सिडेंट्स,अँटी इंफ्लेमेट्रीघटक,अँटी बायोटिक,आणि अँटी डिप्रेसेंट घटकांनी समृद्ध आहे. याचा फायदा आपल्याला नैराश्य दूर करण्यात होईल.
 
हळद आणि लिंबू कसे वापरायचे ते जाणून घ्या -
 
एका भांड्यात चार कप पाणी घेऊन त्यात 1 लिंबाचा रस,2 मोठे चमचे हळद पावडर,4 मोठे चमचे मध,घालून मिसळा.
हे मिश्रण आपण आपल्या सोयीनुसार वापरा. इच्छित असल्यास दिवसातून दोन किंवा तीनदा याचे सेवन करू शकता. याच्या सेवनाने नैराश्य कमी होईल.