स्वत; व इतरांच्या डोक्याला ताप
१) गरज नसताना दूध आणायला जाणे.
२) गेटबाहेर झाडू मारणे, सडा टाकणे. (तरी बरं रांगोळी येत नाही, नाही तर ती पण काढली असती)
३) दिवसभर वॉचमनसारखे खिडकीत बसून राहणे.
४) प्रत्येक काम मीच करायला पाहिजे, असा उगाच तगादा लावणे आणि बाकीचे कसे नालायक आहेत हे दाखवून देणे.
५) पाण्याची टाकी भरेपर्यंत उगाच उभे राहणे, Automatic असली तरी उगाच गच्चीवर जाऊन टाकीत डोकावणे.
६) गरज नसताना बँकेत जाऊन निरर्थक वाद घालणे आणि मी किती कामात पटाईत होतो हे पटवून द्यायचा प्रयत्न करणे.
७) मुलाचे फेकून दिलेले शर्ट, टी शर्ट, शूज उगाचच वापरायला काढणे.
८) कार जर बाहेर काढायची म्हटले, तरी उगाच फालतू चौकश्या करणे.
९) उगाचच चट्ट्या पट्ट्यांची हाफ पॅन्ट घालून गेटमधे किंवा मागच्या दारात उभे राहणे.
१०) बिनाकामाचे फोन करून उगाचच काड्या करीत बसणे.
११) येणाऱ्या जाणाऱ्याला उगाचच एखाद्या नातेवाईका विषयी गाऱ्हाणी सांगत बसणे आणि स्वतःचे हसे करुन घेणे.
१२) नातवांचे मित्र / मैत्रिणी दारात खेळायला आले की अंगावर खेकसणे.
१३) कुठे बाहेर जायचे म्हटले, तरी कार मध्ये पुढे बसायचा यांचाच मान आणि परत वर Driving चे धडे. (गाडी चालवायला येत नसली तरी!)
१४) एखादी आवडती सीरियल / सिनेमा लागला म्हणून बघत बसले, की यांची फालतू बातम्या बघायची वेळ होते!!
१५) बजेट, संसद सभागृहातला गोंधळ समजत नसला तरी वेड्यासारखे tv वर बघत बसणे.
१६) सर्वांचे एकमत झाले असताना मला का विचारले नाही, म्हणून रुसणे आणि विचारले असताना मला कशाला विचारता, म्हणून झटकून टाकणे.
१७) आपल्याला मोबाईल मधले फार कळते, हे समवयीन असलेल्या म्हाताऱ्याला दाखवत काहीतरी सेटिंग चेंज करणे.
१८) एखादी गोष्ट नवीन करताना, उदा: घरातील फर्निचर, फॅब्रीकेशन उगाच स्वतःच्या कारागिराला बोलवून ती गोष्ट चौपट खर्च करून बनवणे आणि ती कितीही वेडी वाकडी झालेली असली, तरी जाणाऱ्या, येणाऱ्याला दाखवून हसे करून घेणे.
१९) उगाचच जुने वाहन, उदा: Scooter अथवा मोटर सायकल न विकता ठेवून देणे, कधीतरी काढून उगाच फार मोठा मेकॅनिक असल्यासारखे किका मारत बसणे, प्लग साफ करत बसणे, (नेमके या वेळेस नातवाची मैत्रीण अथवा सुनेची भिशी असते).
२०) लाइटबील, फोनबील जास्त येते म्हणून जाता येता लाइट बंद करणे, आपण फोनवर बोलताना रागाने पाहणे आणि स्वतः फोन वरून कोणाबरोबर तरी तासानं तास कागाळ्या करीत बसणे.
२१) संध्याकाळी बागेत फिरायला जाणे आणि तसा तास बाकडे अडवून बसून राहणे.
२२) पिवळी गोळी, निळी गोळी अशा प्रकारे गोळ्यांची नावे लक्षात ठेवणे म्हणजे डॉक्टर तपासायला आला की वेडाच व्हावा!!
२३) कारण नसताना सोसायटीच्या कामाचे झेंगट गळ्यात घेणे.
सर्व सेवा निवृत्त लोकांनी हे वाचावे व आपण यातले काय काय करतो, ते तपासणे. तुमचा स्कोर १३ पेक्षा जास्त झाला, तर अधून मधून दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जात जा!!