एक समोसा दुसऱ्या समोशाला काय म्हणेल?
एक समोसा दुसऱ्या समोशाला काय म्हणेल?:
भाऊ जरा नीट ऊभे रहा कोपर लागतय सारखं
एक बाकरवडी दुसऱ्या बाकरवडीला काय म्हणेल?:
तू चितळेंची लेक असल्यासारखी काय वागते?
एक जिलेबी दुसऱ्या जिलेबीला काय म्हणेल?:
तुझा सगळा चिकट घाम माझ्या अंगावर येतोय, तिकडे सरक.
एक बटाटा वडा दुसऱ्या बटाटावड्या काय म्हणेल?:
काय रे ढेरपोट्या किती पोट सुटलंय.
एक अळूवडी दुसऱ्या अळूवडीला काय म्हणेल?:
शी बाई सारखा पदर सुटतोय.