आज नाश्त्याला काय बनवू?
मैं और मेरी तन्हाई,
अक्सर ये बातें करते हैं
आज नाश्त्याला काय बनवू?
अन जेवायला काय करू?
डोक्याचं पार भजं होतं,
कुणाची फर्माईश पुरी करू
ह्याला काय आवडेल,
त्याला काय पसंद पडेल
मैं और मेरी तन्हाई,
अक्सर ये बातें करते हैं
पोह्यांचा रतीब असह्य झालाय
मलाही .. पोरांनाही . .
उपम्याचा जो आलाय वैताग,
त्याला तर उपमाच नाही
रोज रांधायचं काय हीच चिंता,
करने को बहुत कुछ है,
मगर कैसे करे हम
कब तक यूँही
थालीपीठ और
दडपे पोहे सहें हम
दिल कहता है,
असेल नसेल ते कडधान्य शिजव
त्यात गाठे, शेव, चिवडा वाट्टेल ते फरसाण ओत
आणि सांग ..
हां यही मिसळ है, मिसळ है, मिसळ है !!