गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

फोन मधली बाई म्हणाली, “प्लीज ट्राय लेटर”

बंड्या – अरे, आपल्या दोघांकडे मोबाईल आहे ना?
 मग सरळ फोन करण्याऐवजी तू पत्र का पाठवलंस?
गण्या – ओये, मी फोन लावला होता. 
पण फोन मधली बाई म्हणाली, 
“प्लीज ट्राय लेटर.”

*************
 
पूर्वीच्या आणि आताच्या लग्नातील भोजनातील मूलभूत फरक
पूर्वी जेवणारे एका जागी असत आणि वाढणारे फिरत
आणि
आता वाढणारे एका जागी असतात आणि जेवणारे फिरत असतात.
 
*************
 
आई घाबरून म्हणाली बाळा तु लवकर
घरी ये सुनबाईला पेरेलिसीस चा अटॅक आलाय तोंड वाकड डोळे वर आणि मान वळालीय बघ
.
.
.
.
.
मुलगा : आई तु घाबरू नकोस शांत रहा
ती सेल्फी काढत असेल ....

*************
 
एक वेळ अशी होती की..
श्रीकृष्ण बासरी वाजवायचे...
आणि सगळ्या गोपीका त्याच्या कडे धाव घ्यायच्या...
आणि आता कचरे वाला घंटी वाजवतो ...
आणि सोसायटीतल्या सगळ्या बायका त्याच्या कडे धाव घेतात! 
कलियुगाचा महिमा