शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मार्कशीट

भयंकर उकाडा, ..
थकुन भागुन कसातरी घरी आलो. 
सोफ्यावर अंग टाकले, 
पत्नी ने पाण्याचा पेला दिला.
हूश्श करेस्तोवर...
मुलाने मार्कशीट पुढे केले. 
मराठी ३८, 
इंग्रजी ३५,
गणित ४०
पुढचे काही वाचण्यापुर्वीच मी ओरडलो, ..
" पोरा ! काय मार्क हे ? गाढवा, लाज वाटते का काही ? दगड आहेस नुसता दगड..."
पत्नी- अहो पण जरा ऐकता का ?
तू गप्प बैस ! तूझ्या लाडानेच फुकट गेला आहे तो. नालायका, अरे बाप राब-राब राबतो आहे आणि तुम्ही असे गुण मिळवता ..
मुलगा गप्प, ..
मान खाली. 
" अहो ! "
" तू गप्प रहा, एक शब्द बोलू नकोस. आज याला दाखवतोच... "
" अहो ! "
पत्नी चा आवाज चढला, मी थोडा वरमलो. "
" ऐकून तर घ्या ना जरा ! " सकाळी माळा साफ करताना सापडलेली तुमचीच मार्कशीट आहे ती..."
भयाण शांतता..