एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न :
"दिल के टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए"
या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा.
वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे..
विद्यार्थी-१ (पुणे)
ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली...
विद्यार्थी-२ (नाशिक)
ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी...!
विद्यार्थी ३ (मुंबई)
दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली सेंड करुन परतीची लोकल पकडलीस...!
विद्यार्थी-४ (अकोला)
मनाचा बुकना बुकना करून दात ईचकुन निंगुन गेली
विद्यार्थी-५ (अमरावती)
कलिजाचे मार कुटके कुटके केले माह्या, अन दातकाड काहाडत कुठं चाल्ली वं !
विद्यार्थी-६ (यवतमाळ)
निरे तुकळे केलेना हिर्दयाचे, न वरुन जाता जाता बत्तिशी दाखुन राह्यली..आं !!
विद्यार्थी-७ (वाशिम)
कायजाच्या पार चिंध्या करून टाकल्या माहया, अन हेंबाडथुत्री दातकड विचकत जाऊन राहाली भैताड़ लेकाची
विद्यार्थी-८ (बुलढाना)
लांग चिथडे करुन माया कायजाचे वरुन लय दातं इचकून रहाली तु तं.. आन चाल्लि लगे..
विद्यार्थी ९ (वर्धा)
बाप्पा !! पार चिटोरे चिटोरे केले पोट्टिन कायजाचे अन बगा कशी जाऊन रायली फिदिफिदी हासंत
विद्यार्थी १० (नागपूर)
दिलची बोटी बोटी करुन गालात हासत हासत च्याल्ली न बे ...
विद्यार्थी ११ (धुळे)
काळीज ना तुकडा तुकडा करी सन गाल गाल मा हसी सन तरफडली बेरड !
विद्यार्थी १२(लातूर)
आरं बाबो, अगुदर तर काळजाची पार वाट लावली ! वरनं माज्याकड बगुन दाताड इचकत निगुन गेली, च्या मायला...!
विद्यार्थी १३ (मालवण)
मेली अवदीसा नायथयली...,
तेचा त्वांडार शिरापडली ती...,
तेच्या आवशिक खाली कोल्यान...,
माझा काळीज नांगरुन.., खिदळत - खिदळत वाटेक लागला ता अक्कर माशी प्वार...!!!