अर्थाचा अनर्थ
एका मैत्रिणीची बायपास झाली,
तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला....
“Ata tula udya marayala harakat nahi”
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं.
कारण तिने वाचलं....
“आता तुला उद्या मरायला हरकत नाही”
मूळ मेसेज होता...
“आता तुला उड्या मारायला हरकत नाही”!
म्हणून मराठी मराठीतूनच लिहावे,
अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो.