पुण्यातील डॉक्टर जेव्हा वॅक्सीन लावतात
एक इसम वॅक्सीन घ्यायला जातो. खूप बडबड करत असतो
"डॉक्टर, दुखेल का?"
डॉक्टर गप्प.
"डॉक्टर, साईड इफेक्टस कधी जाणवतील?"
डॉक्टर गप्प.
"डॉक्टर, हे वॅक्सीन काम करेल ना? अहो काहीतरी बोलाल की नाही?"
डॉक्टर गप्प.
वॅक्सीन दिल्यावर डॉक्टर म्हणतात "काळजी करू नका, सगळं ठीक होईल"
पेशंटने विचारले की आतापर्यंत का गप्प? आणि टोचून झाल्यावरच काय विशेष की मग बोललात?
ते डॉक्टर म्हणाले माझे मेडिकल शिक्षण पुण्यात झालेय. तेथे मोजकेच बोलतात. पण बोलतात तेव्हा.....
"टोचूनच बोलतात"