मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : मंगळवार, 18 मे 2021 (13:25 IST)

एक पुणेरी माणूस वॅक्सीन घ्यायला जातो

एक पुणेरी माणूस वॅक्सीन घ्यायला जातो, 
खूप बडबड करत असतो...
 
"डॉक्टर, दुखेल का?"
डॉक्टर गप्प.
 
"डॉक्टर, साईड इफेक्टस कधी जाणवतील?"
डॉक्टर गप्प.
 
"डॉक्टर, हे वॅक्सीन काम करेल ना? अहो काहीतरी बोलाल की नाही?"
डॉक्टर गप्पच!
 
वॅक्सीन दिल्यावर मात्र डॉक्टर म्हणाले," काळजी करू नका, सगळं ठीक होईल 
 
"पेशंटने विचारलं," आतापर्यंत गप्प होतात आणि टोचून झाल्यावर मग बोललात.. असं का बरं? "
 
"डॉक्टर म्हणाले," _माझं सर्व शिक्षण  पुण्यातच झालंय. तिथे मोजकंच बोलतात. पण बोलतात तेव्हा.... टोचूनच बोलतात!"