Pune Joke: एव्हरी बडी इज खत्रूड
पुण्यामध्ये एका मुख्य रस्त्यावर एक कार रस्त्याच्या कडेला येऊन थांबली.
आत मध्ये बसलेली इंग्लिश बाई शोधक नजरेने इकडे तिकडे पाहत होती.
तिने काच खाली करून तिथल्या एका पुणेकराला विचारले, "व्हेअर कॅन आय फाईंड खत्रूड?"
आपला पुणेकर म्हणाला, "हियर, एव्हरी बडी इज खत्रूड. हूम डू यू वाँट एक्झेटली?"
तिने एक कागद काढून समोर धरला. त्यावर लिहिले होते "KOTHRUD"!!