मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : शनिवार, 14 एप्रिल 2018 (10:08 IST)

जय भीम बोला

जय भीम बोला,  जय भीम बोला
बाबासाहेबांनी दिला जातीअंताचा टोला
 
माय बाबासाहेब, बाप बाबासाहेब
ज्ञान बाबासाहेब, प्रकाश बाबासाहेब
सांगितले त्यांनी शिका काॅलेज शाळा
 
मान बाबासाहेब, सन्मान बाबासाहेब
शक्ती बाबासाहेब, युक्ती बाबासाहेब
मंत्र दिला संघटित करा आपुल्या बळा
 
प्रज्ञा बाबासाहेब, शील बाबासाहेब
संयम बाबासाहेब, नियम बाबासाहेब
संघर्षाचा विचार दिला त्यांनी  दुर्बळा
 
घटना बाबासाहेब, संघटना बाबासाहेब
मार्ग बाबासाहेब, दिशा बाबासाहेब
दिला त्यांनी दीनांना लोकशाहीचा गळा
 
-उमाजी म. केळुसकर