मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (16:52 IST)

"असं काय बघताय ?

ती घर आवरत होती...
तो सारखं पहात होता...
नजरेत त्याच्या कौतुकाचा 
दिवा जळत होता!
 
तिलाही नवल वाटलं 
त्याची अशी नजर पाहून 
लाजली ती हलकेच 
अन् गेली भारावून !
 
"असं काय बघताय ?
हवंय का काही ?"
"...बघू दे ना असंच 
नकोय दुसरं काही!"
 
"तुमचं उगाच काही तरी"
म्हटलं..पण सुखावली मनात...
त्यानं दुखावली कित्येकदा 
पण विसरली सारं क्षणात!
 
"आज स्वारी अशी फार्मात 
असं काय झालं ?
काय घेऊन बसलात 
माझं कौतुक मेलं !"
 
"राबराब राबलो 
अन् फाइल पूर्ण केलं 
एका चुकीचं निमित्त अन् 
बॉसनं नको तेवढं झापलं"
 
पुरुष असलो तरी 
डोळे आज पाणावले 
"हिचंही असंच होत असेल"
ह्रुदय आतून हेलावले !
 
सारंच आवरुन कशी तू 
हसून स्वागत करतेस ?
कौतुकाची थाप नाहीच 
पण राग मात्र झेलतेस
 
आज मला शब्द दे,
असं सोसणं तू बंद कर 
चुकलो मी कुठं तर 
दाखवून देणं सुरू कर
 
तुझ्या गप्प राहण्यानं 
सारे गृहित तुला धरतात 
बाहेरचा राग वैताग 
फक्त तुझ्यावर काढतात"
 
पापण्यांच्या कडा पुसत 
ती हळूच बोलली,
"बाकी सगळं जाऊ दे,
गंगेला मिळू दे 
अशीच कौतुक थाप 
फक्त अधूनमधून मिळू दे!"