शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जोडावी अक्षरे, खोडाव्या चुका हसावे सदा, लपवून दुःखा...

जोडावी अक्षरे, खोडाव्या चुका
हसावे सदा, लपवून दुःखा...
 
लावावा जीव, वाटावे प्रेम
जगावे खुलास, न वाटावा भेव...
 
अंधार जगाचा, प्रकाशात नहावा
उघडावी मने, उजेड दिसावा...
 
मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा...
 
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे...
 
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे...