मोबाईल कुठून घेतलास?
विद्यार्थी : गुरूजी, मी अभ्यास केलेला काही लक्षात राहात नाही.
गुरूजी : बरं मग सांग गेल्यावेळी माझ्या हातून तू कधी मार खाल्लस होता?
विद्यार्थी : याच मंगळवारी
गुरूजी : बघ, हे कसं लक्षात राहिले ?
विद्यार्थी : गुरूजी मला प्रॅक्टिकल सर्व लक्षात राहतात, प्रॉब्लेम तर थेरीत आहे.
!!!!!!!!!!!!
आई : जर तुम्ही माझं ऐकलत, आणि मला उलटून उत्तर दिलं नाहीत, कुठलाही हट्ट केला नाही, तर मी तुम्हाला गिफ्ट देईन.
बंड्या : राहू दे आई, मग तर सर्व गिफ्ट नेहमी बाबांनाच मिळतील.
!!!!!!!!!!!!
पिंकी : मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला गं, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
पिंकी : कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी...