शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (15:02 IST)

चला थोडं हसू या..

सोनू - आई मी तुझ्यासाठी किती मौल्यवान आहे?
 
आई - बाळा तुझ्यासाठी तर कोटी रुपये देखील कमी आहे...
 
सोनू - आई मग मला त्याचा कोटींच्या रुपयांमधून एक 20 रुपये दे न... मला खाऊ आणायचा आहे.
 
******************************* 

गोलू भोलूला - भोलू मी जर काळ असतो तर लोकांनी माझी किती किंमत केली असती ..
 
भोलू - नाही, अजिबात नाही लोकंतर तुला बघूनच पळाले असते. 
 
गोलू -कसं काय ?
 
भोलू - तुला बघूनच लोकं म्हणाले असते की तो बघा वाईट काळ येत आहे. 
 
 
******************************* 
 
रम्या - गर्दीला बाजू करतं म्हणाला की - मला पण बघू द्या कोणाचा अपघात झालेला आहे? 
कोणीच बाजू झाले नाही तर तो जोरात म्हणाला की ज्याचा अपघात झालेला आहे तो माझा मुलगा आहे. लगेच लोकं बाजूला झाले आणि त्यांना वाट मिळाली. त्यांनी जवळ जाऊन बघितले तर काय तिथे एक गाढव पडला होता.
 
******************************* 

झंपू - चहा नेहमीच नुकसान करते की फायदा ?
 
गंपू - जर चहा आपल्याला बनवायचा असेल तर नुकसानदायी आहे आणि जर आयता मिळत असल्यास फायदा.
 
******************************* 

एक माणूस पॅराशूट विकत होता. विमानातून उडी मारा बटण दाबा आणि जमिनीवर सुरक्षितपणे उतरा.
 
श्यामू - जर पॅराशूट वर उघडला नाही तर काय करणार?
 
दुकानदार - आहो उघडेल शंभर टक्के आणि नाहीच उघडले तर तुमचे पूर्ण पैसे परत देईन.

******************************* 
झम्प्या चे वडील - अरे झम्प्या जरा शेजारच्या लेले काकांकडून कंबरदुखीसाठी मलम घेऊन ये रे. माझी आज फार कंबर दुखत आहे. 
 
झम्प्या - बाबा ते नाही देणार ते फार चिक्कट आहे फार कंजूष आहे ते, त्यांचा कडून मिळण्याची अपेक्षाच करू नका. 
 
बाबा - होय, बाळ तू अगदी बरोबर बोलला. ते तर फार कंजूष आहे इतके श्रीमंत आहे पण स्वभावाने अगदी चिकटे कंजूस आहे. त्यांच्याकडून काही निघणार नाही मलम. असं कर की तू आपल्या कपाटातूनच नवे मलम काढून दे पाठ जरा जास्तच दुखत आहे.