1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
  4. Bal Kavita A Aa Aai M M Maka Lyrics in Marathi

अ आ आई, म म मका

अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका
 
प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ थ थ थवा
बाळ जरी खट्याळ तरि मला हवा
 
ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडीवर बसा नि खुदकन हसा
 
क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बादक तुरतुरु चाले
ग ग गाड़ी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई
 
कवी- मधुसूदन कालेलकर
पुढील लेख
जगातल्या इतर लोकांपेक्षा 'इथल्या' लोकांचे हृदय आणि मेंदू उशिरा म्हातारे होतात!