1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
  4. Bal Kavita Bal Chalala Rnaa Lyrics in Marathi

बाळ, चालला रणा

बाळ, चाललासे रणा घरा बांधिते तोरण,
पंचप्राणांच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण.
 
याच विक्रमी बाहुंनी स्वतंत्रता राखायची,
खांदावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची.
 
म्हणूनिया माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा,
मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते विरांचा
 
नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार,
मीच लावुनी ठेविली तुझ्या तलवारीस धार.
 
अशुभाची सावलीही नाही पडणार येथे
अरे मीही सांगते ना जीजा लक्ष्मीशी नाते.
 
तुझया शस्त्रांना, अस्त्रांना, शक्ती देईल भवानी,
शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी.
 
धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन.
 
कवयित्री- पदमा गोळे
पुढील लेख
दररोज फक्त 5 योगासने करा, तुम्ही नेहमी तंदुरुस्त राहाल