- लाईफस्टाईल
» - बाल मैफल
» - बालगित
आपुलकी संस्कार
भांड्याला भांडे लागता। विसरुनि जावे क्षणामध्ये।। परस्परांना समजूनि घ्यावे। अढी नसावी मनामध्ये।।ज्याची त्याला जागा द्यावी। वयाप्रमाणे मानाची।। एकमताने निर्णय घ्यावे। नको दुरावा घरामध्ये।।आपुलकीच्या नात्यांतून। स्नेह जपावा घरामध्ये।।