शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

गाडी कशी धावते

NDND
गाडी कशी धावते
भप भप भप
पाऊस कसा पडतो
रप रप रप
घोडा कसा धावतो
टप टप टप
बाबा कसे मारतात
धप धप धप
आई कशी म्हणते
गप गप गप
खाऊ देते बाळाला
खुप खुप खुप

-म. पां. भावे