- लाईफस्टाईल
» - बाल मैफल
» - बालगित
गुलाबाचे फूल
एक होती कमल, तिची बहिण विमलदोघींनी बेत केला, घरापुढे बाग करूमग दोघींनी जमीन खणलीवर खत माती घातलीबाजूला विटा लावून जागा तयार झालीबाबांनी गुलाब आणून दिलादोघींनी हौसेने तो लावला, पाणी घातलेबरेच दिवस गेले. गुलाबावर फुले कधी येतात असे दोघींना झाले होते.एकदिवस कळी आली, विमलने ती पाहिलीतिला फार आनंद झालाधावत धावत ती आत गेलीतिने कमलला ती दाखवलीदोघींनी घरातील माणसांना ती दाखवलीदोन दिवसांनी फूल फुलले. ते पाहून विमलला खूप आनंद झालाती म्हणाली, '
हे फूल माझ्या वेणीत फार सुरेख दिसेल.' कमल म्हणाली,'
वा ग वा! माझ्या वेणीतच हे फार चांगले दिसेल'विमलने फूल खुडावयास हात पुढे केला.कमलने फूल खुडावयास हात घातलादोघींचे भांडण जुंपले, भांडणात फूल कुसकरले.फूल कोणालाच मिळाले नाहीफुलाची एक पाकळी गाऊ लागली'
विमलेपाशी कमल भांडली।फूल गुलाबाचे बघुनी।।दोघींचीही फजिती झाली।फूल दवडिले कुसकरुनी।।