शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

थेंब पावसाचा

- सौ. गुजराथी

WD
थेंब पावसाचा रूसून बसला
आभाळाच्या माडीत गुपचुप बसला
धरती मातेने केली विनवणी
आणली पालखी वारेदादांनी
विजयाताईने केली रोषणाई दारात
धडाड धूम फटाके वाजवले अंगणात
थेंबांना वाटली गंमत फार
उघडले हळूच ढगांचे दार
वार्‍याच्या भिंगोर्‍या फिरल्या गरागरा
थेंबाला म्हणाल्या ये ना दोस्त जरा
टप् टप् पाऊस थेंब पडले
अंगणात पाण्याचे साचले तळे
थेंब पावसाचे हसती तळ्यात
होडी कागदाची डोले पाण्यात.