गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By वेबदुनिया|

पंधरा जून - बालगित

- श्रीमती प्रतिभा प्र. गारटकर

तारीख पंधरा जून
सुरु झाली शाळा
पटापटा पटांगणात
मुले झाली गोळा...... ।।1।।
पताका नि माळा
रांगोळ्या ही छान
सजली होती शाळा
हारपून गेले भान....।।2।
नवी नवी पुस्तकं
गरुजींच्या हाती फुले
फुले गुलाबाची
मुले खुश होती.....।।3।।
वाडी वस्ती गावेही
जणू फुलून गेली
चैतन्याच्या बागेला
जागा पुन्हा आली....।।4।
शाळेत चला बाबा
आजच नाव घाला
मोठ्ठा आवाज छोट्यांचा
गावात घुमून गेला ! ..... ।।5।।