शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

शुभंकर

सौ. स्वाती दांडेकर

WD
प्रथम वंदुनी श्री गणेशा
आई सांगते काही तुजला
तू वर्षाची झाली
माझ्या कोवळ्या फूला
तुझे अभिनंदन करते आई
या नवीन जगा
तुला आयुष्य, यश, सुख कीर्ति लाभ
हीच प्रभुला प्रार्थना
आयुष्य हे ऊन सावल
करी न याचा खेद
जीवन हे परोपकारी
ठेवी मनी हा भेद
कपट ना कधी ही करी
ना ठेवी दुर्भावना
फुलच सुगंधित करते बाळ
अवघ्या वातावरणा
सहाय्य करावे अवघ्या जना
न धरुनी काही भेद
सहाय्यच ही कामास येते
जेव्हा अडेल अपली वेळ
तुला यश लाभो बाळ
दैदिप्त सूर्या समान
परि शीतलता ठेवी मनी
या चंद्र किरणा समान
तुला आयुष्य, यश, सुख, कीर्ति लाभो
हीच शेवटी प्रार्थना गजानना.