रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (09:10 IST)

बाल कहाणी -जे इतरांना देऊ ते परत येणार

एका गावात एक शेतकरी राहत होता तो दुधापासून लोणी,दही बनवून विकायचा. एके दिवशी त्याच्या पत्नीने लोणी तयार करून त्याला दिले.तो ते लोणी घेऊन शहराकडे विकायला निघाला.ते लोणी पेढ्याच्या आकाराचे होते आणि प्रत्येकी त्या लोण्याच्या पेढ्याचे वजन 1 किलो होते.

शहरात जाऊन शेतकरी ते लोणी नेहमीप्रमाणे एका दुकानदाराला विकायचा ,आणि त्या दुकानदाराकडून चहापत्ती,साखर,तेल,साबू असं सामान विकत घेऊन आपल्या गावी परतायचा .
तो शेतकरी गेल्यावर दुकानदाराने ते लोणी फ्रिजमध्ये ठेवण्यास सुरु केले. त्याने विचार केला की या लोण्याच्या पेढ्यांचे वजन करून बघावं.त्याने वजन केल्यावर लोण्याच्या पेढ्यांचं वजन 900 ग्रॅम निघालं.त्याने सर्व पेढ्यांचं वजन केल्यावर ते सर्व पेढे 900 -900 ग्रामाचे निघाले.

पुढच्या आठवड्यात शेतकरी नेहमीप्रमाणे त्या दुकानदाराच्या दुकानावर लोण्याचे पेढे देण्यासाठी आला.त्याला बघून तो दुकानदार फार चिडला आणि रागात म्हणाला,निघून जा इथून,मला फसवतो,बेईमानी चा व्यवसाय करतो. मला तुझ्याशी कोणताही व्यवहार करायचा नाही.चालता हो इथून.

900 ग्रॅम लोण्याच्या गोळ्याला 1 किलो म्हणून विकणाऱ्या बेइमानाचे तोंड देखील मला बघायचे नाही.
शेतकऱ्याने अगदी नम्रतेने उत्तर दिले की "भाऊ आम्ही गरीब माणसे आमच्या कडे कुठे मालाला तोलण्यासाठी वजन माप नाही.आपण जे साखर देता त्यालाच वजन म्हणून एका तराजूत ठेऊन वजन घेतो आणि आपल्याकडे घेऊन येतो.हे ऐकून दुकानदाराला आपल्या केलेल्या कृत्याची लाज वाटली.या पुढे त्याने नेहमी प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याचा विचार केला.
 
शिकवण- आपण जे इतरांना द्याल आपल्याकडे ते परत येणार.मग ते मान असो,आदर असो,किंवा धोका.