शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

...तोपर्यंत किंमत कळत नाही

एक राजा आपल्या कुत्र्यासह नौकेत प्रवास करत होता. त्या नौकेत इतर प्रवाशांसह एक दार्शनिक देखील होता. 
 
कुत्र्याने कधीही नौकेत प्रवास केला नसल्यामुळे त्याला सोयीस्कर वाटत नव्हते आणि याच कारणामुळे तो अत्यंत हालचाल करीत होता. तो कुणालाही स्वस्थ बसू देत नव्हता. नाविक देखील त्याच्या या खेळण्या- कूदल्यामुळे परेशान होत होता. त्या वाटत होते की याच्या अश्या वागणुकीमुळे तो ही बुडेल आणि दुसर्‍यांच्याही जीव धोक्यात येऊ शकतो. परंतू कुत्र्याच्या स्वभावावर कोणाचे नियंत्रण. 

राजा देखील हे बघून चिंतित झाला परंतू त्यावर काबू करण्याचा काही मार्गच सुचत नव्हता. तेवढ्यात दार्शनिका राहवले नाही त्याने राजा कडे जाऊन विनंती केली आपली आज्ञा असेल तर मी या कुत्र्याला अगदी शांत करू शकतो. राजाने लगेच होकार दिला. 
 
आता त्याने कुत्र्याला उचलून नदीत फेकून दिले. अशाने कुत्रा घाबरला आणि पाण्यात तरंगत नौकाजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. आता त्याला आपले प्राण वाचणे अशक्य आहे असे वाटू लागले. काही क्षणात दार्शनिकाने त्याला वर खेचून घेतले. 
 
अता मात्र तो कुत्रा चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसून गेला. सर्व प्रवाशी आणि राजादेखील त्याच्या हा बदललेला व्यवहार बघून आश्चर्य करत राहिले. 
 
राजा ने दार्शनिकाला विचारले असे कसे शक्य झाले तेव्हा दार्शनिक म्हणाला "स्वत:वर विपत्ती आल्याविना दुसर्‍यांना होत असलेल्या त्रासाची जाणीव होत नसते. या कुत्र्याला पाण्यात फेकल्यावर त्याला पाण्याची ताकद आणि नौकेचं महत्त्व कळून आलं.