शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (15:13 IST)

बोध कथा: अहंकारी राजा

एका नगराचा राजा खूप अहंकारी असतो. त्याला आपल्या रूपाचा, संपत्तीचा आणि सामर्थ्याचा खूप गर्व असतो. त्याच्याशी युद्ध करायला इतर राज्यांचे राजे घाबरायचे त्या मुळे त्याला फारच माज आलेला असतो. तो आपल्या महालातील सर्व लोकांना तुच्छतेची वागणूक देत असतो. कोणाचा कधीही अपमान करीत असतो. त्याच्या वर त्याच्या नगरातील लोक फार नाराज असतात. 
 
त्याच्या नगरात एक विद्वान ब्राह्मण राहत असतो त्यांचे नाव विद्याधर असत. ब्राह्मण त्या राजाचे गर्व हरण करण्याचा विचार करून त्या राजाच्या महालात येतो. महाराजांना नमस्कार करतो,पण राजा त्याला काहीच प्रत्युत्तर देत नाही. आणि त्याच्याकडे बघून विचारतो की ब्राह्मण तुला काय हवे ते सांग माझ्या कडे सर्व काही आहे. माग तुला हवे ते मागून घे. 
 
ब्राह्मण राजा ला बघून जोर-जोरात हसू लागतो. कोणालाच त्याच्या हसण्याचे कारण कळत नाही. ब्राह्मण हसू आवरून त्या राजा ला म्हणतो की  'हे राजा आपल्याकडे तर मला देण्यासारखेच काहीच नाही, मग आपण मला काय देणार'. असे ऐकून राजा फार संतापतो आणि आपल्या सैनिकांना त्या ब्राह्मणाला बंदी करण्यास सांगतो. तेवढ्यात त्या राजाचा मंत्री त्यांना थांबवतो आणि म्हणतो की महाराज थांबा कदाचित या ब्राह्मणाला काही बोलायचे आहे.
 
त्यावर ब्राह्मण म्हणे 'की महाराज आपण विचार करा की आपला जन्म देखील आपल्या इच्छेने झालेला नाही आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जन्माला घातले म्हणून आपला जन्म झाला आहे. म्हणून हे रूप आपल्याला लाभले आहे. आपले धान्य तर या धरणीमातेने दिले आहे.तिने पीक दिले नसते तर आपल्याला धान्य मिळाले नसते.आपण तर त्या धान्याचा केवळ सांभाळच करीत आहात. 
 
धन म्हणजे ही संपती जी आपल्याला आपल्या प्रजेकडून कराच्या रूपाने मिळालेली आहे आपले राज्य आपल्याला वडिलोपार्जित आहे. आता राहिले आपले शरीरातील प्राण तर हे देखील आपले नाही. हे देखील देवाची देणगी म्हणून आहे. आपल्या कडे तर सर्वच दुसऱ्यांनी दिलेले आहे आपले स्वतःचे काहीच नाही. जर आपल्या कडे काही नाही तर मग आपण मला काय देता आणि कसला गर्व करता. असे म्हणून तो ब्राह्मण निघून जातो राजा त्याच्या मागे जाऊन त्याचे पाय धरतो आणि त्याची क्षमा मागतो. त्याला त्याची चूक कळते. अशा प्रकारे राजाचा गर्व हरण होतो.
 
बोध : स्वतःवर कधीही गर्व करू नये.