शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (20:42 IST)

खोडकर माकड

राजवनात राजू माकडाच्या खोड्यांनी सर्व हैराण झाले होते. तो सर्व प्राण्यांना खूप छळायचा आणि सर्वांच्या खोड्या काढायचा. त्या जंगलातील सर्व प्राणी त्याला आपापल्यापरीने समजवायचे, तरी देखील तो कोणालाच जुमानत नव्हता. 
 
एकदा शाळेत शिक्षिक राजूला जोरदार रागावले. पण राजू वर त्यांच्या रागावण्याचा काहीच परिणाम झाला नाही. या उलट तो त्यांची थट्टा करू लागला. राजूने दुसऱ्या दिवशी देखील त्यांची खोड काढली. त्याने त्यांच्या बसण्याच्या खुर्ची वर खाजरे पान ठेवले ज्यामुळे त्यांचा पूर्ण अंगाला खाज येऊ लागली. 
 
राजू शाळेतच नव्हे, तर घराच्या शेजारी राहणाऱ्या प्राण्यांना देखील छळायचा. शेजारी राहणाऱ्याच्या म्हशींना देखील त्रास द्यायचा. एके दिवशी त्याने कहरच केला. त्याने त्या म्हशीचे केस कुरतडून दिले. 
 
एकदा त्याला शाळेतून परत जाताना लांब जिराफ भेटला. जिराफच्या पायाला त्रास होता त्यामुळे तो लंगडवत चालायचा राजू त्याला लंगड्या म्हणून चिडवू लागला. 
 
जिराफने आपली मान त्याला समजविण्यासाठी खाली करताच राजूला वाटले की हा आपल्याला मारण्यासाठी वाकत आहे. म्हणून त्याने काही ही समजून न घेता रस्त्याच्या मध्ये उडी टाकली. त्याला उडी मारताना येत असलेली कार दिसली नाही त्याला कारची धडक लागली आणि त्याचा अपघात झाला. तो जागीच बेशुद्ध झाला. सर्व प्राणी धावून आले. जिराफला त्याची दशा बघून खूप दया आली त्याला खूप वाईट वाटले. त्याने कार चालकाला विनवणी केली की ह्याला रुग्णालयात नेण्यासाठी मदत करावी. जिराफ देखील त्याच्या सोबत रुग्णालयात गेला. 
 
डॉक्टरांनी तपासणी नंतर सांगितले की या राजूला गाडीची जोरदार धडक लागल्यामुळे ह्याचे हाड मोडले आहे आणि तो खूप गंभीररीत्या घायाळ झाला आहे आणि या साठी त्याची शस्त्र क्रिया करावी लागणार. जिराफने त्याचे प्राण वाचविण्यासाठी आपले रक्त देखील दिले आणि सर्वोपरी मदत देखील केली. 
 
 
जिराफ देवाला आळवत होता की राजूने लवकर बरे व्हावे. जिराफने राजूच्या आई वडिलांना देखील कळवले. ते दोघे तेथे आले. 
 
रात्री उशिरा पर्यंत राजू शुद्धीवर आला सर्वांच्या सह तो जिराफला बघून घाबरला. एवढ्यात डॉक्टरांनी राजूच्या वडिलांना सांगितले की आज जर जिराफ नसता तर राजू वाचलाच नसता.
 
 डॉक्टरांचे म्हणणे एकूण खोडकर राजूच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी जिराफकडे आपल्या वागणुकीची माफी मागितली आणि त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली. त्याने सगळ्यांना वचन दिले की या पुढे तो कधीही कोणाला त्रास देणार नाही तसेच खोडी देखील काढणार नाही. या पुढे तो फार शहाण्यासारखा वागू लागला. खोडकर राजू आता चांगला राजू झाला होता.