शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (14:10 IST)

हत्ती आणि दोरीची कथा

एक दिवस एक माणूस सर्कस बघायला गेला. तेथे जेव्हा तो हत्तीच्या बंदिवास जवळून गेला, तेव्हा त्याने असे दृश्य पाहिले की त्याला आश्चर्य वाटले. त्याने पाहिले की महाकाय हत्तींना फक्त त्यांच्या पुढच्या पायांना दोरी बांधून ठेवलेलं होते. त्याने विचार केला होता की हत्तींना मोठ्या पिंजऱ्यात बंदोबस्ताने ठेवले असावे किंवा साखळ्यांनी बांधलेले असावे. पण तिथले दृश्य पूर्णपणे उलट होते.
 
त्याने महावतला विचारले, "भाऊ! तुम्ही लोकांनी या हत्तींना दोरीच्या साहाय्याने बांधले आहे, तेही त्यांच्या पुढच्या पायाला. ते ही दोरी अशी की अगदी सहज तोडता येईल. मला आश्चर्य वाटते की ते दोरी का तोडत नाहीत? "
 
महावत त्याला म्हणाला, “हे हत्ती लहान होते तेव्हापासून आम्ही त्यांना अशा जाड दोरीने बांधत आहोत. त्यावेळी त्याने दोरी तोडण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते लहान होते. त्यामुळे दोरी तोडणे त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे होते. त्यांना दोरी तोडता आली नाही आणि गृहीत धरले की दोरी इतकी मजबूत आहे की ते तोडू शकत नाहीत. आजही तोच विचार त्याच्या मनात आहे. त्यांना अजूनही वाटते की ते दोर तोडू शकणार नाहीत. म्हणूनच ते प्रयत्नही करत नाहीत."
 
“मित्रांनो, त्या हत्तींप्रमाणे आपणही आपल्या जीवनात नकारात्मक विचारांच्या दोरीने बांधलेले आहोत. आयुष्यात कोणत्याही कामात मिळवलेले अपयश आपण आपल्या मनामध्ये घेतो आणि विश्वास ठेवू लागतो की एकदा आपण कोणत्याही कामात अपयशी ठरलो तर आपल्याला त्यात कधीच यश मिळणार नाही. या नकारात्मक विचारामुळे आपण कधी प्रयत्न करत नाही.
 
या नकारात्मक विचारातून बाहेर पडण्याची तसंच कमतरता ओळखणे आणि त्यावर मात करणे, जे आपल्या अपयशाचे कारण बनले याची गरज आहे. नकारात्मक विचार हा आपल्या यशामध्ये सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणून नकारात्मक विचारांची साखळी तोडून सकारात्मक विचार स्वीकारा आणि आयुष्यात प्रयत्न करणे कधीही थांबवू नका, कारण प्रयत्न करणे ही यशाकडे जाणारी एक पायरी आहे.