गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

किंमत एका पेल्याची

वडील आपल्या मुलाला सद्गुणांची किंमत समजावुन सांगत असतात. एक काचेचा पेला हातात घेऊन ते विचारतात.
वडील : "बाळ, या पेल्याची किंमत किती आहे.?" 
मुलगा उत्तरतो : "असेल पंधरा रुपये." 
वडील : "समज या पेल्यात पाणी भरले तर?" 
मुलगा : "वीस रुपये". 
वडील : "आता या पेल्यात केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरले."
मुलगा : "आता याची किंमत शंभर रुपये होईल.
वडील : "ठीक आहे. आता मी यात सोन्याचे काही दागिने भरतो."
मुलगा : "आता तर याची किंमत लाखोंच्या घरात होईल." 
वडील : आता मी अनमोल अशा जवाहिरांनी हा पेला भरतोय." 
मुलगा : "आता तर याची किंमत अब्जावधीच्या घरात जाईल किंवा त्याही पलीकडे होईल." 
वडील : "बघ हं. नक्की ना.?" असे विचारतात, आणि हातातला पेला फरशीवर सोडून देतात. काचेचा पेला तो. फुटून त्याचे तुकडे होतात. 
वडील : "आता याचे किती रुपये येतील.?" 
मुलगा : "आता याची किंमत शून्य आहे बाबा. उलटपक्षी काचा गोळा करताना त्रास होईल तो वेगळाच." 
वडील सांगतात : "माणसाचेही असेच आहे,बाळा. जितका तू सद्गुणांनी युक्त होत जाशील, तसतसा तू अनमोल बनत जाशील. समाजासाठीही आणि तुझीही योग्य दिशेने उन्नती होत राहिल. पण अवमूल्यन व्हायला, मातीमोल ठरायला, आणि अधःपतन व्हायला मात्र एक क्षणही पुरेसा असतो. तेव्हा सतत सावध राहून 
सद्गुणांची जोपासना कर." 
 
आपल्याला मिळालेला जीवनरुपी पेला कसा भरायचा तो ज्याने त्याने ठरवायचा