मोर आणि सारस
एका तलावाच्या काठी एक मोर राहत होता त्याला आपले सुंदर पंख आवडत असे एके दिवशी एक सारस देखील तिथे राहण्यासाठी आला मोर त्याला म्हणाला , "आपले इथे स्वागत आहे " असं म्हणून त्याने आपले पंख पसरविले उन्हात त्याचे पंख खूपच सुदर दिसत होते. पाण्यात त्याचे प्रतिबिंब दिसत होते. तो आपल्या पंखांकडे बघून अभिमानाने म्हणाला माझ्या पंखांकडे बघा . बघितले की किती सुंदर आणि मोहक आहे. हे तुझ्या पंखांपेक्षा अधिकच सुंदर आहे. " सारस ने मोराच्या अभिमानाला
ओळखले .
तो म्हणाला -' माझे पंख कसे ही असो पण मी त्याच्या साहाय्याने उडू तरी शकतो.आपले हे सुंदर पंख तर काहीच कामाचे नाही आपण याच्या मदतीने उडू शकत नाही .सारसचे म्हणणे ऐकून मोराला आपल्याचुकीची जाणीव झाली त्याने अभिमान करणे सोडले आणि ते दोघेही चांगले मित्र झाले.