बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By
Last Updated : मंगळवार, 25 मे 2021 (11:47 IST)

Gautama Buddha प्रेरक कथा: भगवान बुद्ध आणि चक्षुपाल

एकदा भगवान बुद्ध जेतवन विहारात रहात होते, भिक्षुक चक्षुपाल त्यांना भेटावयास आले. त्यांच्या आल्यामुळे त्यांच्या स्वभावाची दैनंदिनीची आणि गुणांची चर्चा सुरु झाली. 
भिक्षुक चक्षुपाल हे आंधळे होते. एके दिवशी विहारातील काही इतर भिक्षुकांना चक्षुपालाच्या झोपडीच्या बाहेर काही मेलेले कीटक आढळले. त्यांनी चक्षुपालाची निंदा-नालस्ती करायला सुरुवात केली की चक्षुपालाने प्राण्यांना ठार मारले. 
भगवान बुद्धांनी निंदा-नालस्ती करणाऱ्या त्या भिक्षुकांनां बोलविले आणि विचारले की आपण चक्षुपालला हे जीव मारतांना बघितले आहेस का?  
त्यांनी उत्तर नाही बघितले असे दिले. 
या वर भगवान म्हणाले की ज्या प्रकारे आपण चक्षुपालला कीटक मारताना बघितले नाही त्याच प्रकारे चक्षुपालाने हे कीटक देखील बघितले नाही. म्हणून त्यांची निंदा करणे योग्य नाही.      
भिक्षुकांनी भगवान बुद्ध यांना विचारले की चक्षुपाल हे आंधळे का आहे? त्यांनी या जन्मी किंवा गतजन्मी अशी कोणती पापे केली आहे. 
भगवान बुद्धांनी चक्षुपाल बद्दल सांगितले की गतजन्मी ते एक चिकित्सक होते. एका आंधळ्या स्त्री ने त्यांना वचन दिले होते की जर ते तिचे डोळे बरे करतील तर ती आणि तिचे कुटुंब त्यांचे गुलाम होतील. त्या अंध स्त्रीचे डोळे बरे झाले. परंतु दासी होण्याच्या भीतीमुळे तिने हे मानून घेण्यास नकार दिला.  
चिकित्सकाला माहित होते की ही स्त्री खोटं बोलत आहे. त्यांनी त्या स्त्रीला अद्दल शिकवण्यासाठी आणि तिचा सूड घेण्यासाठी चक्षुपालाने तिला एक औषध दिले, त्यामुळे ती स्त्री पुन्हा आंधळी झाली. तिने त्या चिकित्सकांची खूप गयावया केली ती फार रडली तरी त्या चिकित्सकाला तिच्यावर काहीच दया आली नाही. त्यांनी हे पाप केलं त्या परिणामी त्या चिकित्सकाला म्हणजे चक्षुपालाला पुढील जन्मी अंधत्व आले.