शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 15 डिसेंबर 2018 (14:59 IST)

अकबर-बिरबल कथा - जाताना त्याच्या मुठी उघड्या का असतात

एकदा बादशहाने बिरबलला विचारले, ''बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, पण या जगातून जाताना त्याच्या मुठी उघड्या का बरे असतात?'' 
 
बिरबल म्हणाला, ''खाविंद, माणूस जन्माला येताना सभोवतालच्या लोकांना सांगत असतो की, मला जे जे घ्यावंसं वाटेल, ते मी माझ्या मुठीत याप्रमाणे घट्ट पकडून माझं करीन. परंतु मरताना मात्र आपल्या मुठी उघड्या ठेवून तो भोवतालच्या लोकांना सांगू पाहतो की, तुम्ही जगातील वस्तूंचा लोभ धरू नका. आयुष्यभर लोभापायी मी माझ्या मुठी भरल्या, पण त्या सर्व गोष्टी इथेच ठेवून मला रिकाम्या हाताने जग सोडावे लागत आहे. माणूस या जगात प्रवेश करताना बंद मुठीने येतो, पण जाताना त्याच्या मुठी उघड्या का असतात, त्याचे असे स्पष्टीकरण आहे.''