रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (10:39 IST)

Tenali Rama Story : अद्भुत कपडा

kids story
एक वेळची गोष्ट आहे. राजा कृष्णदेव राय विजयनगरमध्ये दरबार लावून बसले होते. त्याच वेळेस एक सुंदर महिला एक पेटी घेऊन आली. त्या पेटित एक सुंदर साडी होती. ती साडी पेटीतून काढून ती राजा आणि सर्व दरबारातील लोकांना दाखवू लागली. साडी एवढी सुंदर होती की सर्व दरबारी आणि राजा पाहून आश्चर्यचकित झालेत.  महिला राजाला म्हणाली की, ती अशीच सुंदर साडी बनवते. तिच्याजवळ काही कारागीर आहे. जे त्यांच्या गुप्त कालांनी ही साडी विणतात. तिने राजाला निवेदन केले की जर राजाने तिला काही धन दिले तर त्यांच्यासाठी पण ती अशीच साडी तयार करेल. 
 
राजा कॄष्णदेवरायने महिलाचे म्हणणे ऐकले आणि तिला धन दिले. महिलाने साडी तयार करण्यासाठी एक वर्षाचा अवधी मागितला. या नंतर ती महिला साडी तयार करणाऱ्या आपल्या कारागिरांसोबत महल मध्ये राहू लागली. व आणि साडी विणु लागली. त्या महिलेचा व करागिरांचा सर्व खर्च राजमहल करत होता. याप्रमाणे एक वर्षाचा अवधी निघून गेला. मग राजाने आपल्या मंत्र्यांना साडी झाली का, हे पाहण्यासाठी पाठवले. जेव्हा मंत्री करागिरांच्या जवळ गेलेत. तर ते आश्चर्यचकित झालेत. ते कारागीर बिना धाग्याने काहीतरी वीणत होते. महिलाने सांगितले की कारागीर राजासाठी साडी वीणत आहे. पण मंत्री म्हणालेत की, त्यांना कुठलीच साडी दिसत नाहीये. यावर महिला म्हणाली की, ही साडी फक्त तेच लोक पाहू शकतात. ज्यांचे मन साफ आहे. आणि जीवनात त्यांनी काहीच पाप केले नसेल. महिलाचे हे म्हणणे ऐकून राजाचे मंत्री चिंतेत पडले ते बहाना बनवून महिलेला म्हणाले की , साडी बघितली आणि तिथून निघून गेलेत.राजा जवळ येऊन म्हणालेत की साडी खूप सुंदर आहे. राजा या गोष्टीने खूप आनंदित झाले. 
 
दुसऱ्या दिवशी त्या महिलेला दरबारात साडी घेऊन हजर राहण्यास सांगितले. ती महिला परत ती पेटी घेऊन कारागिरांसोबत दरबारात हजर राहिली. तिने दरबारात पेटी उघडली आणि सर्वांना साडी दाखवू लागली. दरबारातील सर्व लोक आश्चर्यचकित होते कारण  राजासमवेत दरबरतील लोकांना ती साडी दिसत नव्हती हे पाहून तेनालीराम राजाच्या कानात म्हणाला, की ती महिला खोटे बोलली आहे ती सर्वांना मुर्ख बनवत आहे. 
 
तेनालीराम त्या महिलेला म्हणाले की, साडी कोणालाच दिसत नाहीये. तेनालीरामचे हे म्हणणे ऐकून ती महिला म्हणाली की, ही साडी फक्त त्यांनाच दिसेल ज्यांचे मन साफ असेल आणि त्यांनी काहीच पाप केले नसेल. महिलाचे हे म्हणणे ऐकून तेनालीरामच्या मनात एक कल्पना आली. ते महिलाला म्हणाले की, राजाची इच्छा आहे की तू स्वता त्या साडीला घालून दरबारात ये व सर्वांना दाखव. 
 
तेनालीरामचे हे बोलणे ऐकून महिला राजाची माफी मागू लागली. तिने राजाला सर्व खरे सांगितले की तिने कुठलीच साडी बनवली नाही. ती सर्वांना मुर्ख बनवत होती. महिलाचे म्हणणे ऐकून राजाला खूप राग आला. महिलेला जेल मध्ये टाका असा आदेश राजाने दिला. मग महिलाने खूप विनंती केली म्हणून तिला सोडून देण्यात आले. सोबतच राजाने तेनालीरामच्या चतुर्याचे कौतुक केले. 
 
तात्पर्य - खोट हे जास्त दिवस लपून राहत नाही. एकनाएक दिवस सत्य हे सर्वांसमोर येतेच. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik