शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)

शेतकरीचा हुशार मुलगा

शंकर नावाचा एक शेतकरी होता. तो शेती करून आणि झाडाचे लाकडे विकून जगायचा.एकदा तो लाकडे आपल्या बैलगाडीत घालून विकायला घेऊन केला.
 
वाटेत शंकरला त्या गावाचा शेठ भेटला त्याने शंकर ला विचारले की या गाडीचे किती रुपये. शंकर ने त्याला 5 रुपये असे सांगितले. शेठ म्हणाला की ठीक आहे मी हे सर्व खरेदी करत आहे तू ही गाडी माझ्या घरी सोड.
शंकर खूपच भोळा भाबडा होता तो लाकडाने भरलेली गाडी घेऊन त्या शेठच्या घरी पोहोचला शेठ ने त्या लाकडांचे पैसे त्याला दिले. शंकर पैसे घेऊन बैल गाडी घेऊन परत येऊ लागला. तर शेठने त्याला अडविले आणि म्हटले की आपले बोलणे तर पूर्ण गाडीचे झाले होते. आता तू ही बैलगाडी नेऊ शकत नाही मी तुझ्या कडून ती खरेदी केली आहे. शंकर म्हणाला की असं कसं शक्य आहे.शेठ म्हणाला की मी तुला विचारले की ही गाडी कितीला त्यावर तू 5 रुपये असे उत्तर दिले .मी तुला गाडीचे पैसे दिले आता तुला तुझ्या वचनाचे पालन करायला पाहिजे. शंकर ने त्याला खूप विनवणी केली तरी तो शेठ काहीही ऐकायला तयार नाही. त्याने शंकरला हाकलून पाठवून दिले.
शंकर ला रित्या हाती घरी यावे लागले. घरी आल्यावर त्याच्या मुलांनी त्याला बैलगाडीचे विचारले त्यावर त्याने घडलेले सर्व सांगितले.शंकर चा धाकटा मुलगा खूप हुशार होता त्याने त्या शेठला धडा शिकविण्याचा विचार केला.
दुसऱ्या दिवशी तो देखील बैलगाडीत लाकडे घालून विकायला घेऊन गेला. वाटेत तोच शेठ त्याला भेटला त्याने विचार केला की आज देखील ह्याची फसवणूक करू.
 
शेठ ने त्याला तेच विचारले की ''या गाडीचे किती पैसे?
त्यावर शंकरच्या मुलाने उत्तर दिले फक्त 'दोन मूठ ' शेठ ने विचार केला की हा कसा मूर्ख आहे.दोन मूठ मध्ये मी दोन आणे ह्याला देईन. 
 
शेठ ने होकार दिले आणि गाडी माझ्या घराकडे ने असे सांगितले घरी गेल्यावर त्याने गाडीतून सर्व लाकडे काढून शेठच्या घरात काढून ठेवले. शेठ घरातून दोन्ही मूठ मध्ये 2 आणे दाबून घेऊन आला.
त्याने शंकरच्या मुलाला म्हटले की हे घे दोन मूठ पैसे. शंकरच्या मुलाने चाकू काढून त्या शेठ चे हात धरले आणि म्हणाला की मी तर दोन मूठ पैसे नाही तर तुझ्या हातातील हे दोन मूठ पाहिजे आणि असं म्हणत तो त्यांना कापायला धावला.
शेठ ने घाबरून हात मागे घेतले आणि त्यासाठी नकार दिला त्यावर शंकरचा मुलगा त्याला तू वचन दिले आहेस आता त्याला पाळायला पाहिजे. त्याने त्या शेठ ला सांगितले की कशा प्रकारे तू माझ्या वडिलांची फसवणूक केली .
या वर शेठ ने त्याच्या कडे हात जोडून माफी मागितली आणि बैलगाडी आणि त्याच्या लाकडाची योग्य किंमत दिली. अशा प्रकारे शंकरच्या मुलाने आपल्या बुद्धिमतेने आपल्या कुटुंबाला फसवणुकी पासून वाचवले.