प्रत्येक चमकणारी वस्तू सोन्याची नसते
एकदा एक काळविट किंवा बारसिंगा तलावाच्या काठावर पाणी पित होता. त्याने दोन तीन घोटच पाण्याचे घेतले असतील की त्याने स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात बघितले. त्याने आपल्या शिंगाना बघून विचार केला की "अरे वा माझे शिंग किती सुंदर आणि देखणे आहे.इतर कोणत्याही प्राण्याचे शिंग एवढे छान नसतील." नंतर त्याची दृष्टी त्याच्या पायाकडे गेली त्यांना बघून त्याने विचार केला ''आणि माझे हे पाय किती पातळ आणि कोरडे आणि कुरूप आहे." पायाला बघून त्याला खूप वाईट वाटले.
पाणी पिऊन तो पुढे वाढणार की त्याच्या कानात बिगुलाचा आवाज आला. त्याच्या लक्षात आले की शिकारी त्याचा पाठलाग करत आहे. तो आपले जीव वाचविण्यासाठी शक्य तितक्या वेगाने पळाला. त्याचे चपळ पाय त्याला शिकारीपासून खूप लांब नेण्याचा प्रयत्न करत होते. तो वेगाने धावत होता. पळता पळता घनदाट झुडपा मध्ये शिरतो. त्याचे शिंग घनदाट झाड आणि झुडपांमध्ये अडकतात. इच्छा नसल्यास तरीही त्याला तिथे अडकून बसावं लागत.त्याचे शिंग असे अडकून जातात की त्याला काहीही हालचाल करणे अशक्य होत. शिकारी जवळ येण्याचा आवाज जवळ ऐकू येत होता. तो आपले शिंग काढविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता.शिकारी त्याच्या जवळ आला. त्याला हे कळून चुकले होते की आता शिकारीच्या वेढ्यातून वाचणे अशक्य आहे. आणि ज्या शिंगांवर तो गर्व करत होता त्या शिंगांमुळे त्याचे प्राण संकटात सापडले आहे आणि ज्या पायांना तो कुरूप म्हणत होता त्यांनी त्याचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात शिकारीने त्याच्या वर बाणाचा नेम धरून त्याला ठार मारले. एका बाणानेच त्याचे प्राण गेले आणि तो जमिनीवर कोसळतो.
तात्पर्य - प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसते.