रविवार, 26 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा
Written By वेबदुनिया|

''माकड आणि मगर''

बोध कथा मराठी

माकड आणि मगर
PR
कृणाल एंटरटेनमेंट कंपनीने 'के - टून्स' या सिरीजद्वारे ''माकड आणि मगर'' ही बोधकथेची नवी ऍनिमेशन आणि कार्टूनची व्हिसीडी प्रका‍‍‍शित केली आहे. भद्रिक वीरा यांनी प्रस्तुत केलेल्या या व्हिसीडीमध्ये एकुण चार मजेशीकथांचा समावेश आहे. त्यात 'सिंह आला रे आला', 'सोन्याचं अंड', 'माकड आणि मगर' व 'राजाची निवड' अशा चार मनोरंजक आणि बोधप्रद कथांचा समावेश आहे. यातील 'माकड आणि मगर' या कथेत एका माकडाची आणि मगरीची दोस्ती होते. पण शेवटी मगर कशी माकडाच्या जीवावर उठते ही कथा आहे. यात कोणत्याही मित्रावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये असा संदेश देण्यात आला आहे. असेच संदेश आणि बोध इतर तीन कथांमध्ये देण्यात आले आहेत. लहान थोर सर्वांना आवडणारी ही व्हिसीडी फक्त ३६ रूपयांत सर्वत्र उपलब्ध आहे.