गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2024 (16:15 IST)

कुकरच्या शिट्टीमधून डाळ येते बाहेर, अवलंबवा या टिप्स

Pressure Cooker, How to Use Pressure Cooker, Pressure Cooker Using Tips, How to Clean Pressure Cooker, Health News, Webdunia Malayalam
प्रेशर कुकरच्या उपयोगामुळे तुम्ही जेवण पटकन बनवू शकतात. कुकरच्या मदतीने अनके पदार्थ बनवले जातात. पण भारतीय घरांमध्ये प्रेशर कुकरमध्ये वरण-भात बनवला जातो. वरण बनवणे कुकरमध्ये खूप सोप्पे आहे. तसेच कधी कधी कठीण देखील होते कारण अनेक वेळेला कुकरमध्ये डाळ लावली असतांना शिट्टीच्या माध्यमातून डाळ बाहेर येते. ज्यामुळे गॅस गॅसप्लॅटफॉर्म खराब होतो. सोबत जवळपासच्या वस्तूंवर, भितींवर थेंब उडतात. जर तुमाला ही समस्या दार करायची असेल तर या टिप्स अवलंबवा.     
 
1. टिशू पेपरचा उपयोग करावा- 
जर कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर कुकरच्या शिट्टी भोवती एक ओला पेपर किंवा ओला रुमाल गुंडाळून ठेवावा. यामुळे पाणी बाहेर येणार  नाही. 
 
2. डाळ भिजवून घ्यावी- 
डाळीला शिजवण्यापूर्वी ती अर्धा तास अगोदर भिजत टाकावी. यामुळे कुकरच्या शिट्टीमधून पाणी निघणार नाही. तसेच डाळ देखील लवकर शिजेल. 
 
3. मोठ्या गॅस वर शिजवू नये- 
छोट्या कुकरला मोठ्या गॅस वर ठेवल तर, उष्णतेने पाणी शिट्टीमधून बाहेर येते. म्हणून डाळ शिजवताना माध्यम गॅस वर शिजवावी. 
 
4. पाण्याकडे ठेवावे लक्ष- 
जर तुम्ही कुकरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी टाकले तर हे पाणी बाहेर येते. म्हणून कुकिंग करतांना जास्त पाणी वापरू नये. 
 
5. शिट्टीची साफसफाई- 
कुकरच्या शिट्टीमध्ये धूळ जमून जाते किंवा अन्नाचे कण जमतात. यामुळे काही वेळेस शिट्टी होत नाही किंवा शिट्टीमधून पाणी बाहेर येते. याकरिता प्रेशर कुकरची शिट्टी नियमित स्वच्छ करावी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik