संबंधित माहिती
- पोहे खाण्याचे फायदे जाणून घ्या, मुलांच्या आहारात समाविष्ट करा
- गॅस न वापरता बनवा झटपट या सोप्या रेसिपी
- Karva Chauth Recipe 2025 करवा चौथ दिवशी हे ५ खास पदार्थ बनवा
- पावसाळा स्पेशल कुरकुरीत पोहे पकोडे रेसिपी
- Ganesh Chaturthi Special Pohe Laddoo Recipe : गणेश चतुर्थीला बाप्पाला पोह्याचे लाडू बनवा, रेसिपी जाणून घ्या
अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट नाश्ता पोहे; मऊ आणि चवदार होण्यासाठी काही छोट्या टिप्स
कांदे पोहे हा महाराष्ट्रातील घराघरांत बनवला जाणारा अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट नाश्ता आहे. पोहे मऊ आणि चवदार होण्यासाठी काही छोट्या टिप्स महत्त्वाच्या असतात. या टिप्स वापरून तुमचे पोहे नक्कीच चवदार आणि मऊ होतील!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
योग्य पोह्यांची निवड
पोहे बनवण्यासाठी नेहमी 'जाड पोहे' किंवा 'मध्यम पोहे' वापरावेत. पातळ (नायलॉन) पोह्यांचा चिवडा होतो, ते कांदे पोह्यांसाठी वापरू नयेत.पोहे भिजवण्याची पद्धत
पोहे कधीही पाण्यात भिजत घालू नका. ते एका चाळणीत घेऊन स्वच्छ धुवावेत आणि लगेच पाणी निथळून घ्यावे. पोहे धुताना हलक्या हाताने धुवावेत जेणेकरून त्याचा लगदा होणार नाही.मुरण्यासाठी वेळ द्या
पोहे धुतल्यानंतर ते १०-१५ मिनिटे चाळणीतच राहू द्या. यामुळे ते व्यवस्थित फुगतात आणि मोकळे होतात.मीठ आणि साखरेचा वापर
पोहे कढईत टाकण्यापूर्वी, चाळणीत असतानाच त्यात मीठ, थोडी साखर आणि लिंबाचा रस मिसळावा. यामुळे प्रत्येक पोह्याला चव लागते.वाफ काढणे महत्त्वाची
फोडणीत पोहे टाकून मिक्स केल्यानंतर, कढईवर २-३ मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढा. पोहे मऊ होण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे.पाण्याचा हबका
जर पोहे कोरडे वाटत असतील, तर वाफ काढताना हातावर थोडे पाणी घेऊन त्याचा 'हबका' मारावा. यामुळे पोहे जास्त वेळ मऊ राहतात.बटाट्याचा वापर
कांदा परतताना त्यात बटाट्याचे बारीक काप घातल्यास पोह्यांची चव अधिक वाढते. तसेच, शेंगदाणे फोडणीत आधी तळून घेतल्यास ते कुरकुरीत लागतात.ओलं खोबरं आणि कोथिंबीर
पोहे तयार झाल्यावर वरून भरपूर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातल्यास पोह्यांचा स्वाद हॉटेलसारखा लागतो.अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: पावसाळा स्पेशल कुरकुरीत पोहे पकोडे रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
